शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेने शुल्कवाढ केल्याच्या निषेधार्थ संघटनांनी आणि पालकांनी शाळेच्या आवारात मंगळवारी आंदोलन केले.
शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळा दरवर्षी शुल्कात वाढ करत असल्याची पालकांची तक्रार आहे. पालकांना विश्वासात न घेता शाळा शुल्क वाढवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी या शाळेचे शुल्क ज्युनिअर केजीसाठी १५ हजार होते, ते वाढवून या वर्षी २० हजार करण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा आणि पालकांनी शाळेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी ज्युनिअर केजीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रियेबाबतही पालकांनी प्रश्न उपस्थित केले. ज्युनिअर केजीची प्रवेश प्रक्रिया कोणत्या निकषांच्या आधारे करण्यात आली, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. मागील वर्षीपासून शाळेने त्यांची बससेवा बंद केली असून ती या वर्षी सुरू करण्यात यावी अशी मागणीही पालकांनी केली आहे. याबाबत पालकांच्या मागण्यांचे निवेदन एकत्र करून ते शाळा व्यवस्थापनाकडे देण्यात आले आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”