News Flash

वास्तुप्रदर्शनाचा ग्राहकांना लाभ- महेश झगडे

अधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून वास्तू घेणे हे केव्हाही हिताचेच

‘क्रेडाईने आयोजित केलेल्या वास्तुप्रदर्शनामुळे सर्व प्रकारच्या वास्तू एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाल्याने ग्राहकांना त्यांची निवड करणे सोपे जाईल. तसेच, अधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून वास्तू घेणे हे केव्हाही हिताचेच आहे,’ असे मत पुणे महानगर प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी या प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त केले.
क्रेडाई पुणे – मेट्रोचे पुण्यातील पश्चिम विभागीय वास्तू प्रदर्शनाचे ऑर्कीड हॉटेल, बालेवाडी येथे प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. पुण्यातील ९० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, ५०० हून अधिक वास्तू आणि देशातील अग्रेसर बँकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. आजच्या ट्रेंडला साजेल असे हे प्रदर्शन असल्याने, वास्तू घेण्यासाठी किंवा पशांची गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी संधी येथे उपलब्ध झाली आहे. रविवारीही सुरू राहणाऱ्या (१८ ऑक्टोबर) या प्रदर्शनात सदनिका, प्लॉट्स, शॉप्स आणि बंगलोज अशा विस्तृत पर्यायामधून ग्राहक आपल्यासाठी योग्य वास्तू निवडू शकणार आहेत.
‘आपले स्वतचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते परंतु आपण नेमके कुठे व कशी गुंतवणूक करावी हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. आज ग्राहकांसाठी या प्रदर्शना मार्फत अनेक मोठे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये वास्तूंवर व्याजाच्या तसेच इतर सवलती असल्यामुळे ग्राहकांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा,’ असे मत क्रेडाई पुणे- मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल फरांदे यांनी या वेळी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 3:30 am

Web Title: architectural exhibitions benefit to consumers mahesh zagade
Next Stories
1 बाह्य़वळण महामार्गावरील प्रलंबित कामांबाबत एकत्रित बैठक होणार
2 भामा आसखेड योजनेसाठी सर्व संबंधितांची बैठक बोलवा
3 कात्रज बोगद्यात टेम्पोला आग लागल्याने वाहतूक विस्कळीत
Just Now!
X