21 September 2020

News Flash

डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली अन्यायकारक – आझम पानसरे

कार्यक्षम व पारदर्शक आयुक्तांची अध्र्यात बदली करणे अन्यायकारक असून ते आयुक्तपदी पाच वर्षे राहिले, तरी शहरवासीयांचा फायदाच होईल, अशी भूमिका आझम पानसरे मांडली.

| January 24, 2014 03:22 am

पिंपरीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशींची बदली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली असताना आणि राष्ट्रवादीचे माजी महापौर, आमदार, पदाधिकारी बदलीसाठी अडून बसले असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आयुक्तांना पाठबळ देत अजितदादांनाच आव्हान दिले आहे. कार्यक्षम व पारदर्शक आयुक्तांची अध्र्यात बदली करणे अन्यायकारक असून ते आयुक्तपदी पाच वर्षे राहिले, तरी शहरवासीयांचा फायदाच होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आयुक्तांच्या बदलीला विरोध करत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा शहरातील काही संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी पानसरे यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत दिला. उद्योजक धनंजय शिरबाळे, डॉ. सुशील मुथीय्यान, डॉ. श्याम आहिरराव, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते विकास पाटील, काशीनाथ पाटील, विनायक रणसुभे, सुनील कारभारी, रमेश सरदेसाई, राजू भावसार, विजय सूद, अमोल देशपांडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या पानसरे यांचे अजितदादांशी फारसे जमत नाही. कोणत्याही परिस्थितीत परदेशींची बदली करण्याचा निर्धार अजितदादांनी केला असताना पानसरेंनी मात्र आयुक्तांच्या समर्थनाची भूमिका घेतल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
पानसरे म्हणाले, आयुक्तांचे काम चांगले आहे. पालिकेत आतापर्यंत झालेल्या चुकीच्या गोष्टींना पायबंद घालताना त्यांनी शिस्त लावली, सुधारणा केल्या. पाडापाडीमुळे आयुक्तांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोध होत असला, तरी न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना कारवाई करणे भाग पडते आहे. त्यांचे कोणाशी वैर नाही. प्रामाणिक, कार्यक्षम आयुक्तांची बदली होता कामा नये, या भूमिकेमागे अजितदादांना आव्हान देण्याचा प्रश्नच नाही. आयुक्तांमुळे विकासकामांना खीळ बसला, या तक्रारीत तथ्य आहे, त्याकडे आयुक्तांनी अधिक लक्ष द्यावे. आयुक्तांची बदली होऊ देणार नाही, ती झाल्यास रस्त्यावर उतरू, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 3:22 am

Web Title: azam pansare shrikar pardeshi transfer injustice
टॅग Injustice,Transfer
Next Stories
1 आता पोलीस घेणार, एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा!
2 पुण्याच्या सौंदर्यासाठी हवे, संरचनात्मक नियोजन धोरण!
3 पुणेकरांना सर्वाधिक अॅलर्जी घेवडा अन् खेकडय़ाची! – तिशीतील तरुणांना सर्वाधिक अॅलर्जी
Just Now!
X