20 November 2019

News Flash

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बलेनो कारचं स्टेअरिंग अडकल्याने अपघात

किवळे एक्झिटला हा अपघात झाला अशीही माहिती समजली आहे

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बलेनो कारला अपघात झाला आहे. या कारचं स्टेअरिंग अडकल्याने ही कार वळणावरच्या सिमेंटच्या कठड्याला धडकली. सोलापूर शहर विभागाचे डीसीपी मधुकर गायकवाड या अपघातात जखमी झाले आहेत. किवळे एक्झिटला हा अपघात झाला. ज्यानंतर देहू रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या चालकालाही इजा झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील किवळे एक्झिट येथे वळणावर गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट सिमेंट च्या कठड्याला जाऊन धडकली. ही घटना सकाळी साडेआठ च्या सुमारास घडली आहे. अपघातात सोलापूर शहराचे डीसीपी मधुकर गायकवाड हे किरकोळ जखमी झाले असून चालक देखील जखमी झाला आहे. अद्याप गाडीत किती जण होते हे समजू शकलेले नाही. ते मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला. अपघातात गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

 

First Published on June 18, 2019 10:17 am

Web Title: balino car accident on mumbai pune express high way scj 81
Just Now!
X