राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘अभिनंदन’ मुलाखत घेतली. याशिवाय सरकारमधील विविध मंत्र्यांनी आपापल्या कामगिरीबाबत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. सरकारची वर्षभरातील कामगिरी वाखाणण्याजोगी झाली असं मत सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलं तर या सरकारने वर्षभरात जनतेकडे दुर्लक्ष केल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आली. त्यातच आज पुण्यात भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘लोकसत्ता.कॉम‘शी बोलताना उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

पंकजा मुंडे यांनी दिली कोविड टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट

“महाविकास आघाडी सरकारचे एक वर्षाच्या कामगिरीचे वर्णन करायचे झाल्यास महाअपयशी सरकार म्हणावं लागेल. या सरकारने महाराष्ट्राला अनेक वर्ष मागे नेलं आहे. या सरकारकडून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. मराठा आरक्षण टिकवता आलेले नाही. वीज बिलाचा गोंधळही खूप मोठा आहे. तशातच संपूर्ण जगावर आलेल्या करोनाच्या संकटाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले असून करोना परिस्थिती या सरकारला हाताळता आलेला नाही”, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीका केली.

“ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघाल्याचं ‘हे’ आणखी एक उदाहरण”

“महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीनही पक्षात समन्वय नाही. एकाही पक्षात अंतर्गत समन्वय नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास वीज मंत्री एक भूमिका मांडतात. त्यांचे काँग्रेसचे नेते मंत्री अशोक चव्हाण त्यावर प्रतिक्रिया देतात. त्याही पुढे जाऊन काँग्रेसचे मंत्री थोरात तिसरेच मत मांडतात. त्यामुळे या तीनही पक्षात ‘ना एकमत ना धोरण’ असा प्रकार आहे. याच सरकारमधील काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात हे तुमच्या सरकारचे यश काय विचारल्यावर, ‘एक वर्ष भाजपला रोखण्यात यशस्वी झालो’ असं म्हणतात. ज्या सरकारसमोर विकासाचा अजेंडा नाही अशा सरकारबद्दल काय बोलणार?”, असा टोला त्यांनी लगावला.