पुण्यात ३१ डिसेंबर च्या रात्री बॉलिवूड कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी हा शो रद्द करण्यात आल्याने पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी या कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्निव्हलला या ठिकाणी संमती मिळाली नसल्याचं सांगत ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. लोकांना त्यांचे पैसे परत देण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे मात्र अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. या कार्यक्रमासाठी कपल तिकिट ३ हजार तर १८०० रुपये एकट्यासाठीचं तिकिट होतं. या कार्यक्रमाला आलेल्या पुणेकरांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आमचे पैसे लवकारत लवकर परत मिळावेत अशीही मागणी पुणेकरांकडून केली जाते आहे