खंडाळा घाटातील टायगर पॉईंटजवळ पहाटेच्या सुमारास एक कार दरीत पडली आणि एकाचा मृत्यू झाला. तर सीटबेल्ट लावल्यामुळे इतर तिघेजण आश्चर्यकारक रित्या बचावले. पहाटे ३ वाजून ५८ मिनिटांनी शिवदुर्ग टीमला आय. एन. एस. शिवाजीपासून लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या घाटात एक चारचाकी महिंद्रा एक्सयुव्ही ५०० दरीत कोसळल्याचा फोन आला. या कारमधले काही लोक जखमी झाल्याची माहिती या शिवदुर्ग टीमला मिळाली. जी मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले.

ही कार सुमारे १५० फूट दरीत कोसळली. दरीतल्या घनदाट आणि गर्द झाडांमध्ये ही कार पडलेली आढळून आली. या कारच्या एका बाजूला एक तरूण पडलेला आढळून आला. तपास केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मनिष रमेश प्रीतवानी असे या तरूणाचे असं या तरूणाचं नाव आहे. त्याचे वय २५ असल्याचेही समजते आहे. तो खारघरचा रहिवासी होता.

संतोष पाटील, भक्ती पाटील आणि अमोल कुंटे हे तिघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. या तिघांनाही लोणावळा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सकाळी सहाच्या सुमारास मृत तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. हा अपघात कसा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

शिवदुर्ग रेस्क्यू टीम