पिंपरी-चिंचवडमध्ये निगडीच्या भक्ती शक्ती चौकाजवळ कंटेनर आणि दुचाकी चा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री झाला आहे असं पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, कंटेनर चालक फरार झाला असून देहूरोड पोलीस  त्याचा शोध घेत आहेत.

सौदागर दशरथ लोंढे (वय-२७, ऐश) मोहम्मद खान (वय-२३) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर दत्तू कांबळे वय-२६ असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा भरधाव वेगात दुचाकी भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने जात होती. तेव्हा, अचानक कंटेनर समोरून वळताना दिसला मात्र दुचाकी वरील नियंत्रण सुटून थेट चाकाखाली गेली यात दोघांच्या अंगावरून कंटेनर गेले असून एक जखमी झाला आहे. दरम्यान, कंटेनर चालक हा फरार झाला आहे अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली असून त्याचा शोध सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भक्ती शक्ती चौकात पुलाचे काम सुरू आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्या प्रमाणे वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांनी यश आलेले नाही. नेहमीच येथे वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे दोघांच्या मृत्यू जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.