पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत देशाविदेशातील विविध संस्थांसह एकूण २६ सामंजस्य करार केले. या करारांतून १२ अभ्यासक्रमांची निर्मिती झाली आहे. विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा २० मार्चला आयोजित करण्यात आली आहे. या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यात आली आहे. त्यात सदस्यांनी काही ठराव मांडले आहेत, तसेच काही सदस्यांच्या प्रश्नांना व्यवस्थापन परिषदेने उत्तरे दिली आहेत. तसेच काही सदस्यांनी आर्थिक तरतुदींबाबत सुधारणा सुचवल्या आहेत.

अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी गेल्या दोन वर्षांत झालेले सामंजस्य करार, त्यातून निर्माण झालेल्या अभ्यासक्रमांचा तपशील विचारला होता. ‘विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत २६ सामंजस्य करार के ले. या सामंजस्य करारांतून १२ अभ्यासक्रमांची निर्मिती झाली.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, संस्थांसह के लेल्या कराराअंतर्गत चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कं पनी सेक्रे टरीज ऑफ इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्के ट या राष्ट्रीय संस्थांसह के लेल्या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशीपची सुविधा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती नवोपक्रम आणि नवसंशोधन केंद्रातर्फे  डॉ. पराग काळकर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार होऊन पाच वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या नावापुढील ‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ हे लिहिण्याची पद्धत बंद करावी, असा ठराव अधिसभा सदस्य डॉ. कान्हू गिरमकर यांनी मांडला आहे. तर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फु ले यांचा पूर्णाकृ ती पुतळा बसवण्याचा प्रस्ताव शशिकांत तिकोटे यांनी अधिसभेपुढे मांडला आहे.

अधिसभा अडचणीत?

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाची अधिसभा प्रत्यक्ष पद्धतीने होणार की नाही अशी अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. तसेच उपस्थितीच्या संख्येबाबतही निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने प्रत्यक्ष पद्धतीने अधिसभा घेण्याबाबत शासनाला पत्रव्यवहार के ला आहे. शासनाच्या निर्देशांनुसार अधिसभा घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिसभेबाबत दोन दिवसांत नेमके  चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.