माजी सैनिकांच्या जागेत अतिक्रमण करुन भिंत बांधली; पोलीस ठाण्यात निम्हण व समर्थकांकडून गोंधळ
बाणेर भागातील माजी सैनिकांच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटविल्यानंतर पुन्हा तेथे बेकायदेशीररीत्या भिंत बांधणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सनी निम्हण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शनिवारी रात्री चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर निम्हण आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, महापालिके च्या कारवाईबाबत महापालिका भवानात जाऊन शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण यांनी आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे पालिकेतही तणावाचे वातावरण निर्माण झाला होते.
सहायक पोलीस निरीक्षक पी.ए. भोगम यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. बाणेर येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३९/ ५ जागा माजी सैनिकांच्या मालकीची आहे. या जागेवर बेकायदेशीररीत्या भिंत बांधण्यात आली होती. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बांधकाम विभागाला ही भिंत पाडण्याचे आदेश दिले होते.
शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली भिंत पाडण्यात आली. त्यानंतर सनी निम्हण व त्यांचे सहकारी तेथे आले आणि त्यांनी पुन्हा तेथे भिंत बांधली. त्या वेळी माजी सैनिकाचे नातेवाईक तेथे आले. निम्हण यांनी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, तसेच तेथील नागरिकांशी वादावादी केली, असे सहायक निरीक्षक भोगम यांनी फिर्यादीत नमूद केले.
त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. निम्हण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नागरिक ठाकरे यांच्याकडे दाद मागणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (२१ ऑगस्ट) पुण्यात येत असून कुमार सत्पर्षी यांच्या गौरव समारंभात ते उपस्थित राहणार आहेत. बाणेर भागात घडलेल्या प्रकारामुळे निम्हण यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी सर्व नागरिक रविवारी ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Thane municipal corporation, commissioner, action against illegal construction, Thane
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
police committed suicide
खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या