News Flash

पुणे : दोन गटात तुफान राडा, सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करुन खून

'चॉकलेट सुन्याच्या गटातील एकाने निलेश वाडकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर कोयत्याने सपासप वार केले'

पुण्यातील जनता वसाहत परिसरात दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सराईत गुन्हेगार निलेश उर्फ निल्या वाडकर याचा खून झाला असून या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या या तुंबळ हाणामारीत अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, मात्र त्यांची नावं अजून कळू शकलेली नाहीत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात पर्वती कमानीजवळ आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या या दोन गटात काही कारणावरून हाणामारीची घटना घडली. चॉकलेट सुन्याच्या गटातील एकाने निलेश वाडकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर कोयत्याने सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेल्या निल्याला जवळील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामध्ये अन्य दोन गंभीर जखमी आहेत. दत्तवाडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

निलेश वाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच तो आरोपी होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर नुकताच तो जामिनावर सुटला होता. दरम्यान हा राडा दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून झाल्याचंही बोललं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2019 9:12 pm

Web Title: criminal nilesh wadkar murder in pune
Next Stories
1 पिंपरी : आठवलेंच्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार थोडक्यात बचावले
2 पिंपरी चिंचवड : ‘डीपी’ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू
3 शोकाकुल वातावरणात शहीद मेजर शशीधरन नायर यांच्यावर अंत्यसंस्कार
Just Now!
X