महानंद दुग्धशाळेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांमधील जनावरांना मोफत पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (१ मे) दुपारी ३ वाजता कात्रज डेअरीमध्ये होणार आहे.
दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन महानंदतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवडय़ाला ४ किलो प्रती जनावर असे जुलैपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्य़ातील एकूण १००९ छावण्यांमध्ये पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार आहे. गुजरात राज्य सरकारच्या मेहसाणा, अमूल आणि साबर डेअरीतर्फे हे पशुखाद्य महानंदला मोफत देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे व इतर उपस्थित राहणार आहेत.