डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

विद्वत्ता, नर्मविनोदबुद्धी आणि बरोबरच्या माणसांवर छाप पडणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व अशा अनेक गोष्टींचा मिलाफ अटलबिहारी वाजपेयी यांच्या ठायी होता. संजीवन रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी वाजपेयी पुण्यात आले होते तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पहिल्या इमारतीचे उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मात्र ते पंतप्रधान म्हणून आले होते.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
challenge to Sharad Pawar to remove Santosh Chaudharys displeasure in Raver
रावेरमध्ये संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे शरद पवार यांच्यासमोर आव्हान
Vishal Patil, Sanjay Raut
संजय राऊत सांगलीत असताना निवडणूक लढण्याचे कॉंग्रेसच्या विशाल पाटलांचे संकेत
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

या दोन्ही प्रसंगी त्यांच्या बरोबर काही वेळ राहण्याची संधी मिळाली. दोन्ही वेळा त्यांचे विचार आणि विद्वत्तेने माझ्यासह सर्व उपस्थितांना प्रभावित केले. रुग्णालयाचे उद्घाटन करत असल्याने काय भावना व्यक्त कराव्या असे धर्मसंकट माझ्यापुढे आहे. शारीरिक वेदना आणि त्रास घेऊन रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयाची भरभराट व्हावी असे म्हणणे गैर ठरेल असे म्हणत त्यांनी आपल्या विद्वत्तेची प्रचिती दिली. दीनानाथ रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी वाजपेयी आले तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर होते, मात्र भारत-पाकिस्तान संबंधांतील तणाव तीव्र असल्याने वातावरण गंभीर होते. त्याही परिस्थितीत वाजपेयी यांचे शांतचित्त व्यक्तिमत्व, रुग्णालयासाठी देणगी देणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांची त्यांनी केलेली चौकशी हे आजही त्यांच्यापैकी अनेकांच्या स्मरणात आहे. अनेक वर्षांपूर्वी वाजपेयी आणि अडवाणी यांनी ज्ञानप्रबोधिनीला एकत्र भेट दिली होती, त्यावेळची छायाचित्रे मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखवली तेव्हा हास्यविनोद आणि स्मरणरंजनात रमलेल्या वाजपेयी-अडवाणी यांचा साक्षीदार मी होऊ शकलो.