सीडॅकने तयार केलेल्या विविध प्रणालींचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून सीडॅकच्या वर्धापनदिनानिमित्त सीडॅकने तयार केलेल्या विविध प्रणालींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सीडॅक तर्फे आरोग्य, सुरक्षा, वैयक्तिक काळजी, अशा विविध प्रकारच्या प्रणालींची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रणालींचे प्रदर्शन सीडॅकने भरवले आहे. सीडॅकच्या वर्धापनदिना निमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सायंकाळपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सीडॅकच्या २७ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला नॅसकॉमचे माजी संचालक आणि नॅशनल इनोव्हेशन काऊन्सिलचे सदस्य किरण कर्णिक, आयसर पुणेचे संचालक प्रा. कृष्ण गणेश उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.