पुण्यातल्या विमानतळ भागात वास्तव्य करणाऱ्या आणि स्वतःच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडिलांना पुणे विमानतळ पोलिसांनी गजाआड धाडलं आहे. विमानतळ पोलिसांनीच या संदर्भातली माहिती दिली. विमानतळ भागात रहाणाऱ्या एका कुटुंबात ११ वर्षे आणि ९ वर्षे तसेच या दोघांपेक्षा एक लहान अशी तीन भावंडं आहेत. तिघे खेळत असताना सर्वात लहान मूल खाली पडले. त्यामुळे वडिलांनी दोन भावांना केबलच्या वायरने मारण्यास सुरूवात केली. या मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बालहक्क कृती समितीच्या सदस्यांना एका सजग नागरिकाने संपर्क साधला. यानंतर बाल हक्क कृती समितीचे सदस्य या मुलांच्या घरी आले. त्यांच्या अंगावर केबलने मारल्याचे व्रण दिसून आले. त्यानंतर बालहक्क कृती समितीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विमानतळ पोलिसांनी या मुलांच्या वडिलांना अटक केली आणि न्यायलयासमोर हजर केले. न्यायालयाने मारहाण झालेल्य मुलांच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे.