पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित वाढले, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ९५३ झाली आहे. आतापर्यंत ४ हजार ८३४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ३५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला. तसेच, आजपर्यंत शहारात १ लाख ९० हजार ९१८ जण करोनामुक्त झालेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली व एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, २५१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ६२५ वर पोहचली असून यापैकी, ९८ हजार ६१३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४२ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ५१ मृत्यू, ६ हजार २१८ करोनाबाधित वाढले

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळत असून, रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना, करोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार २१८ नवे करोनाबाधित वाढले असून, ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५१ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूणच ही आकडेवारी सर्वसामान्यांसह सरकार व प्रशासनासाठी देखील चिंताजनक आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये लॉकडाउन व नाईट कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आलेली आहे.