पुणे शहरात आज दिवसभरात २८ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ९५ हजार ९२४ झाली आहे. आतापर्यंत शहरात ४ हजार ८०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज २६२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर १ लाख ८९ हजार २३७ जण करोनातून बरे झाले आहेत.

“…तर पुण्यात ‘ते’ चार भाग कंटेन्मेंट झोन करणार”

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २२७, तर ग्रामीणभागातून शहरात उपचारासाठी आलेल्या ८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. याशिवाय ३४ जण करोनामुक्त झाले. दिलासादायक बाब म्हणजे आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार २३७ वर पोहचली आहे. यापैकी, ९८ हजार ९७ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७८१ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus : राज्यात २४ तासांत ४० मृत्यू, ४ हजार ७८७ करोनाबाधित वाढले

दरम्यान, राज्यातील करोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होतो की काय? अशी भीती देखील सर्वसामान्यांच्या मनात आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे करोना बाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. तसेच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.६२ टक्के आहे.