पिंपरीत उद्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम

पिंपरी : वाढलेल्या वेतन भत्त्यांच्या करापासून बचत शक्य आहे का? त्यासाठी गुंतवणूक नेमकी आणि कुठे करायची, म्युच्युअल फंड सुयोग्य पर्याय कसा? जास्त आणि सुरक्षित परतावा कुठे मिळेल, अशा विविध प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देत गुंतवणुकीची अचूक वेळ साधण्याच्या मार्गाची उकल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाद्वारे गुरुवारी (३० जानेवारी) होणार आहे. या कार्यक्रमात आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील सभागृहात (पहिला मजला, जीबी हॉल) सकाळी पावणेअकरा वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जजू मार्गदर्शन करणार आहेत. तर, ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर प्रशांत चौबळ सविस्तर माहिती देणार आहेत.

सेवानिवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल? आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचा अधिक परतावा मिळण्याबरोबरच पैसे सुरक्षित कसे राहू शकतील याची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. गुंतवणुकीविषयी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना सोप्या भाषेतील उत्तरांसह दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे. फक्त महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी हा कार्यक्रम असून तो विनामूल्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी या बाजारातील जोखमींच्या अधीन असतात, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’

* कधी ? गुरुवार, ३० जानेवारी

* केव्हा ? सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी

*  कुठे ? पिंपरी महापालिकेचे सभागृह (पहिला मजला, जीबी हॉल)