22 March 2019

News Flash

आरक्षणावर राज्य सरकारचा वेळकाढूपणा

काँग्रेस व राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा आरोप

सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात विविध संस्था संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

काँग्रेस व राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा आरोप

आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यातील फडणवीस सरकार बहुजन समाजाची फसवणूक करत असून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करण्याचे सरकारचे धोरण स्पष्टपणे दिसून येते, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरीत बोलताना केली.

सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध संस्था संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या वेळी बोलताना साठे व वाघेरे यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.

साठे म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतर मराठा, मुस्लीम, धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, सरकारने जनतेची फसवणूक चालवली आहे. न्यायालयाचा मुद्दा पुढे करून मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल केली जात आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी राबणारे आमदार, खासदार आरक्षणाच्या मुद्दय़ावर मौन बाळगून आहेत. वाघेरे म्हणाले, की आरक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. खोटी आश्वासने देऊन सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.

First Published on August 11, 2018 1:27 am

Web Title: maratha kranti morcha 9