सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने करोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करते आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु झाली आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु झाल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी पीटीआयला दिली आहे. “१५० ते २०० जणांना आम्ही ही लस दिली आहे. आता आम्ही या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहोत असंही डॉ. मुरलीधर तांबे यांनी म्हटलं आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या करोनावरच्या अनेक लशींवर काम सुरु आहे. तर सिरम इन्स्टिट्युट ऑक्सफर्डच्या मदतीने करोनाला प्रतिबंध करणारी जी लस तयार करते आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात सुरु झाली आहे.

सध्याच्या घडीला संपूर्ण जगाला करोनाचा सामना करावा लागतो आहे. अशात सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या रोगाला प्रतिबंध करणारी लस. पुण्यातील सिरम इन्सिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणते आहे. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित असावी आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी हादेखील सिरमचा मानस आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पार पडल्या आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देश करोना संकटाचा सामना करतो आहे. अशात ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे.