प्रभाग क्रमांक १२ मयूर कॉलनीडहाणूकर कॉलनी

कोथरूड विधानसभा मतदारसंघात म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात नव्याने तयार झालेल्या मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी या प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपबरोबरच शिवसेनेची ताकदही चांगली आहे. प्रामुख्याने जुन्या कोथरूड गावठाणाचा या प्रभागात समावेश असला तरी प्रभागाच्या नावामध्ये त्याचा उल्लेख नाही, हे या नव्या प्रभागाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या परिसराने शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला विजयी केले आहे. तर अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतरही भाजपच्या उमेदवाराने विक्रमी मतांनी विजय संपादन केला. महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप-सेना युती तुटल्यास प्रभागात बहुरंगी पण चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

अलीकडच्या काळात कोथरूडचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला. गतिमान विकासामुळे कोथरूड हे उपनगर शहरातील महत्त्वाचे उपनगर ठरले. शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी उपमहापौर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता श्याम देशपांडे यांच्या कार्यक्षेत्राचा समावेश या प्रभागात झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगेश मोकाटे, संगीता मोकाटे यांचा संपूर्ण प्रभाग, शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि भाजपच्या नगरसेविका मोनिका मोहोळ यांचा प्रभाग तसेच मनसेचे नगरसेवक आणि गटनेता अ‍ॅड. किशोर शिंदे आणि जयश्री मारणे यांच्या प्रभागाचा काही भाग नव्या प्रभागात एकत्रित झाला आहे.

या प्रभागातील राजकारणावर पूर्वीपासूनच स्थानिक आणि मुळशी पट्टय़ातील राजकारण्यांचे मोठे वर्चस्व राहिल्याचेही दिसून आले आहे. प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व असले तरी भाजपचीही प्रभागातील ताकद वाढली आहे. गतनिवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. भाजपकडील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. मनसेचे प्रभागात आव्हान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे मतदार जपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी असल्यामुळे काही उमेदवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी सुरू झाली आहे.

जोरदार तयारी

ही परिस्थिती असली तरी प्रत्यक्षात लढतीचे चित्र हे प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपच्या संभाव्य युतीवरच अवलंबून राहणार आहे. सेनेचे पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, शाम देशपांडे, संगीता देशपांडे, भाजपकडून मोनिका मोहोळ, मुरलीधर मोहोळ, ज्योत्स्ना कुलकर्णी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांच्यासह अन्य पदाधिकारी इच्छुक आहेत. तुल्यबळ उमेदवार या प्रभागातून लढणार असल्यामुळे येथे मोठी चुरस राहणार आहे. सद्यस्थितीमध्ये युती होणार नाही अशी शक्यता गृहीत धरून सेनेकडून जोरदार तयारीही सुरू झाल्याचे चित्र आहे.