आदित्य बिर्ला रुग्णालय रुग्ण सेविका आणि सेवकांवर अन्याय करत असून जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याचे गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनावर कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी रुग्णालयाच्या गेटवर येऊन रुग्ण सेविका आणि सेवकांनी धरणे आंदोलन केले आहे. दरम्यान, आदित्य बिर्लाच्या अधिकारी रेखा दुबे यांनी संबंधित आरोप खोडून काढले असून संबंधित स्टाफला जे जेवण दिले जाते तेच मी आणि इतर स्टाफ जेवतो असे त्या म्हणाल्या आहेत.

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालय अनेकदा प्रकाश झोतात या ना त्या कारणाने असते. दरम्यान, आज रुग्णालयातील रुग्ण सेवक आणि रुग्णसेविका यांनी धरणे आंदोलन करत विविध मागण्या केल्या आहेत. रुग्णसेवक म्हणाला की, “रुग्ण सेवकांवर अन्याय होत आहे. रुग्णालयात जेवण व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे स्टाफ काम करण्यास इच्छुक नाही. गेल्या महिन्यात रुग्णांलय प्रशासनाने आश्वासन दिले होते. की, कोविड साहित्य मिळेल आणि पगारवाढ होईल मात्र तसं झालं नाही. कोविड वॉर्डमध्ये १२ तास रुग्णालयात ड्युटी करावी लागत आहे. मानसिक त्रास होत आहे” असे ते म्हणाले आहेत. लवकरात लवर मागण्या मान्य कराव्यात असे कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

“मानसिक त्रास आणि निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असेल तर त्यांनी कोणाकडे जायला हवं? आमच्याकडे यायला हवं होतं पण मीडियाकडे गेले आहेत. त्यांना जे जेवण मिळत ते मी आणि इतर स्टाफ देखील खात आहोत. आमच्या व्यक्तींना आम्ही कसा त्रास देणार, आम्ही रुग्णांना बरे करण्यासाठी आहोत त्रास देण्यासाठी नाही.”

रेखा दुबे- आदित्य बिर्ला रुग्णालय