25 September 2020

News Flash

सळसळत्या रक्ताचा, धगधगता अंगार.. ‘छावा’

शिवसूर्य परिवार निर्मित आणि महेंद्र महाडिक लिखित सळसळत्या रक्ताचा, धगधगता अंगार ‘छावा’ या दोन अंकी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

| March 3, 2015 03:00 am

शिवसूर्य परिवार निर्मित आणि महेंद्र महाडिक लिखित सळसळत्या रक्ताचा, धगधगता अंगार ‘छावा’ या दोन अंकी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. गणेश कला क्रीडा रंगमंचावर रविवारी नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. तसेच या वेळी या नाटकाचे नवीन दहा प्रयोगाचे बुकिंगही झाले आहे.  
या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार बाबुराव पाचर्णे, दादासाहेब सातव, शिवसूर्य परिवाराचे प्रमुख रामदास हरगुडे, मनसेच्या चित्रपट सेनेच्या प्रमुख कीर्ती फाटक आदी उपस्थित होते. या वेळी ‘शिवसूर्य.इन’ या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले.  
पहिल्याच प्रयोगाला पुणेकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. नाटकात शंभूराजांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने साकरली आहे, तर आलमगीर औरंगजेबाच्या भूमिकेत रवी पटवर्धन यांनी काम केले आहे. दुमजली किल्ल्याची प्रतिकृती साकरण्यात आली असून, खटकेबाज संवाद आणि नाटकाचे रेखाचित्रण हे या नाटकाचे वेगळेपण आहे. तसेच औरंगजेबाने शिवाजी महाराजांना बंदी, त्यावेळी शंभूराजांनी त्यात बजावलेली महत्त्वाची भूमिका, त्यांच्यावर झालेला खोटा आरोप, त्यावेळी त्यांना साथ देणारे हंबीर मोहिते आणि त्यातून त्यांची सुटका, शंभूराजांचा छत्रपती पदवी समारंभ ते त्यांचा औरंगजेबाकडून झालेला छळ आणि त्यांना त्यात आलेले विरमरण दाखवण्यात आले आहे.  
राज्यात गड-किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटनांच्या सहकार्याने गडावर विविध उपक्रम यापुढे राबविणार असल्याचे शिवसूर्य परिवाराचे हरगुडे यांनी या वेळी सांगितले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रातही काम परिवारच्या वतीने काम करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 3:00 am

Web Title: play sambhaji raje drama booking
टॅग Drama
Next Stories
1 ‘पाया पडूनही घुमानला जात नाही, आपले पुनर्मूल्यांकन केले पाहिजे’ – डॉ. द. भि. कुलकर्णी
2 पिंपरी काँग्रेसचा तिढा आता अशोक चव्हाणांच्या कोर्टात
3 पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बाराही सदस्य इच्छुक
Just Now!
X