18 January 2021

News Flash

अतिरिक्त आयुक्तांना मारहाण: पुणे महापालिका कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सोमवारी वाद झाला होता.

पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर देखील सहभागी झाले होते.

तलावांमधील जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या निविदेत गैरप्रकार झाल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांकडून महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सोमवारी वाद झाला. त्यातून नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी निंबाळकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानुसार काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यासह १५ जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चप्पल फेकून मारणे,अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवारीही याचे पडसाद महापालिकेत उमटले. पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पत्रकाराशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोणतेही आरोप ऐकले पाहिजे आणि आमच्या फाईलवर सही करावी, ही नगरसेवकांची नेहमीची मागणी असते. मनपा प्रशासन विरूद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष आहे. त्याचबरोबर निविदात कोणताही गैरप्रकार घडला नसून निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार केला हा दुर्दैवी बाब आहे. निविदा २५ कोटींची असली तरी आम्ही त्याला मंजुरी दिली नव्हती. अधिकाऱ्यांना आणि मला चोर म्हटले पण मला स्वाभिमान असल्यानेच मी याला विरोध केला. अरविंद शिंदे यांनी भडकावून चिथावणी दिल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 5:16 pm

Web Title: pmc workers on strike after congress ncp workers attack official
Next Stories
1 पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या
2 जागा काँग्रेसकडे, भेट राष्ट्रवादीच्या नेत्याची!
3 १० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती?
Just Now!
X