करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात पिंपरीतल्या एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. या कुटुंबासाठी आधार ठरले ते पोलीस. आठ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी असलेल्या या कुटुंबाला उद्या खायचं काय? घरातला किराणा संपला आता करायचं काय ? बाळाचं पोट कसं भरायचं? हे प्रश्न पडले होते. अशा अत्यंत अडचणीच्या वेळी पोलिसांनी या कुटुंबाला आधार दिला.

पिंपरीत पूजा आणि इंद्रजीत सिंग हे दोघे त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळासह रहात आहेत. मात्र त्यांच्या घरातला किराणा संपला. अखेर पूजाने तिच्या भावाला उत्तर प्रदेशात फोन केला. पूजा आणि इंद्रजीत यांना बाळाची चिंताही सतावत होती. अशात उत्तर प्रदेशात जेव्हा पूजा यांनी भावाला फोन केला तेव्हा या भावाने पोलीस ठाण्यात फोन करुन मदतीची याचना केली.. आणि पोलीस अगदी देवासारखे मदतीला धावले. पाहा याच संदर्भातला विशेष व्हिडीओ