आधी चायनीज रेस्तराँ सुरू करून रेकी केली आणि नंतर ज्वेलर्सच्या दुकानांवर चौघांनी हात डल्ला मारल्याची घटना पुण्यात घडली आहे. सराफाच्या दुकाना शेजारी चायनीज सुरू करून अज्ञात चार नेपाळी तरुणांनी सराफाच दुकान फोडल्याच समोर आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी चायनीज सुरू केलेल्या दुकानातून थेट सराफ दुकानाच्या भिंतीला भोक पाडून दुकान फोडले आहे.

अज्ञात आरोपींनी दुकान फोडून दीड किलो चांदी आणि दहा ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या यासह इतर साहित्य चोरुन नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. अस एकूण 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटने प्रकरणी विष्णू काळूराम वर्मा यांनी फिर्याद दिली आहे. पुण्याच्या बावधन परिसरातील हुतात्मा चौकात अज्ञात चार आरोपींनी आठ दिवसांपूर्वी चायनीज चा व्यवसाय सुरू करायचा म्हणून दुकान घेतलं होतं.

आरोपींनी चायनीज रेस्तराँ सुरू केलं. फ्लॉवर रेस्टोरंट अस नाव देण्यात आलं. त्याच्या शेजारीच जगदंबा ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान होते. चायनीज आणि सराफ दुकानामध्ये एकच भिंत होती. हेच हेरून त्यांनी एका रात्रीत पोट माळाच्या भिंतीला मोठे भोक पाडून सराफा दुकानात प्रवेश करत दीड किलो चांदीचे दागिने आणि दहा ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आहेत. ही घटना गेल्या आठवड्यात पुण्याच्या बावधन परिसरात घडली असून चोरटे सीसीटीव्हीचा डिव्हीआर घेऊन पसार झाले आहेत. त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.