मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांना जबाबदार ठरणाऱ्या भरधाव वाहनांच्या चालकांवर महामार्ग पोलिसांतर्फे १९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३८३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरस्पीड, ओव्हटरटेक, टायर फुटणे या कारणांमुळे होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांतर्फे पोलीस अधीक्षक एस. जी. सोनावणे, पोलीस उपअधीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली १९ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई केली. एकूण ३८३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ७६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक चाळके, वडगावचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक संतोष वैरागडे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.