26 February 2021

News Flash

प्रजासत्ताक दिनानिमित्त १ रुपयात चहा, २५ वर्षीय तरूणाचा अनोखा उपक्रम

चहाचा गोडवा हिंजवडी मधील अनेक असंख्य संगणक अभियंत्यांनी घेतला

समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतून हिंजवडी येथील वाकळे अमृतुल्य ने प्रजासत्ताक दिनानिमित्त चक्क १ रुपयात चहा आणि मस्कापाव ग्राहकांना दिला होता. या चहाचा गोडवा हिंजवडी मधील असंख्य संगणक अभियंत्यांनी घेतला आहे. पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा या उपक्रमा मध्ये तब्बल ३ हजार ७०० जणांनी चहाचा आस्वाद घेतला आहे.२४ वर्षीय निलेश गजानन वाकळे यांनी हात गाडीपासून व्यवसायाची सुरुवात केली होती.आज मात्र त्यांचा चहाचा व्यवसाय जोरात चालत आहे.त्यामुळे त्यांनी तरुणांना व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्त नागरिक कोणते ना कोणते उपक्रम राबवत असतात.याच भावनेतून वाकळे यांनी आपण १ रुपयात चहा आणि मस्कापाव द्यायचा अस ठरवलं.ते त्यांनी सत्यात उतरवलं आणि शनिवारी पहाटे पाच ते रात्री अकरा पर्यंत शेवटचा ग्राहक येई पर्यंत उपक्रम सुरू ठेवला होता.यात मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंते,स्थानिक नागरिक असल्याचे निलेश सांगतात.एक रुपयांना चहा असल्याने शनिवारी तब्बल ३ हजार ७०० कप चहाचा खप झाला आहे.वाकळे अमृत्यूल्य हे हिंजवडी येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंते याच आस्वाद घेताना दिसत आहेत.

निलेश यांचे शाळेत मन रमत नव्हते,त्यामुळे त्यांनी व्यवसायात स्वतःझोकून दिले.त्यांचं शिक्षण हे दहावीपर्यंत झालं असून आज ते यशस्वी व्यवसायिकाकडे वाटचाल करत आहेत. ते दररोज १२ ते १३ हजार रुपये या व्यवसायातून कमावत आहेत.त्यामुळे तरुणांनी व्यवसायाच्या भरोस्यावर न राहता स्वतःचा व्यसाय करावा अस ते म्हणतात.निलेश यांना वडील आणि मोठा भाऊ व्यवसायात हातभार लावत आहे.काही वर्षांपूर्वी निलेश हे हिंजवडी येथील आयटीपार्क मध्ये हात गाड्यावर व्यवसाय करत असत.चहा पोहे हे त्यावेळी खूप चालायचे,मात्र याच आयटीपार्क मध्ये मोठा व्यवसाय करायचा चंग निलेश यांनी बांधला होता तो त्यांनी काही प्रमाणात सत्यात उतरवला आहे.निलेश यांनी अनेक व्यवसाय केले त्यात अपयश आले मात्र त्या अपयशाला खचून न जाता निलेश यांनी प्रयत्न सुरू ठेवले.आज ते चांगले व्यवसायिक असून दोन चहा ची हॉटेल आहेत.त्यामुळे कुठलाच व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो.सध्या तरी हिंजवडी मधील संगणक अभियंत्यांच्या पसंतीला चहा उतरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 2:16 pm

Web Title: pune tea stal one rupes
Next Stories
1 पुण्यातील तुळशीबागेतील दुकानाला लागलेली भीषण आग आटोक्यात
2 पुण्यात समलिंगी जोडप्याच्या हस्ते झेंडा वंदन
3 पिंपरी-चिंचवड : ५००० विद्यार्थ्यांनी सादर केले देशभक्तीपर गीत
Just Now!
X