05 April 2020

News Flash

राज्यात सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज

मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी (२५ मार्च) विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पहाटेपासून दुपापर्यंत  जोरदार पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरमध्ये ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उद्या आणि परवाही पावसाचा अंदाज आहे.

झाले काय?

बंगालच्या उपसागरावरून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतो आहे. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही विविध ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पाऊसस्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:11 am

Web Title: rainfall forecast in all parts of the state abn 97
Next Stories
1 करोना व्हायरस : पुण्यातील  तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह, उद्या डिस्चार्ज दिला जाणार : महापौर मुरलीधर मोहोळ
2 महाराष्ट्रातले पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी
3 शेतमालाची वाहतूक ठप्प
Just Now!
X