सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या वादग्रस्त ठरलेल्या संस्थेचे संचालक मंडळ आणि तज्ज्ञ संचालक मंडळाची व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याची शिफारस राज्य सरकारने के ली आहे. या संस्थेचे कामकाज सहकार कायद्यानुसार योग्यप्रकारे चालवले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशानंतरच संचालक मंडळ बरखास्त होणार आहे.

सहकार विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना सहकार आयुक्तालयाला दिल्या आहेत. या संस्थेवर २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीसाठी संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

२८ मे २०१८ रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये तज्ज्ञ संचालक मंडळाची व्यवस्थापन समिती स्थापन झाली आहे. संचालक मंडळ आणि समिती रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. ही संस्था १०० वर्षे जुनी असून सध्या या संस्थेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. सहकार आयुक्तांकडून याबाबतचे आदेश प्रसृत के ल्यानंतर सध्याचे संचालक मंडळ बरखास्त होऊन नवीन स्थापन होऊ शके ल, असे सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

संस्था वादग्रस्त

ही संस्था कायम वादग्रस्त ठरत आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एका कार्यकत्र्याने बंदूक दाखवल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये संघाच्या अध्यक्षपदी रामदास मोरे, तर उपाध्यक्षपदी हिरामण सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. या संस्थेवर २१ जणांचे संचालक मंडळ आहे.