लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने ४५० गरजू आणि हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या वेळी ‘रेडिओ वन’च्या केंद्र प्रमुख सबिना संघवी, अकिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पर हेग्गेन्स आणि अर्नवाझ दमानिया आदी उपस्थित होते.
शिष्यवृत्तीचे हे १८वे वर्ष आहे. विज्ञान, नर्सिग, फिजिओथेरपी आणि डीएड अशा विविध क्षेत्रांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्ीिनींना फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत करण्यात येते. यंदा आलेल्या १२०० हून अधिक अर्जामधून ४५० मुलींची निवड करण्यात आली. ‘अर्जाच्या संख्येवरुन असे दिसून येते की, मुख्यत्वेकरुन ग्रामीण भागात मुलींच्या उच्च शिक्षणाबद्दलचे महत्त्व आणि जाणीव विकसित झाली आहे,’ असे मत लीला पूनावाला यांनी व्यक्त केले. ‘मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन करत राहीन,’ असेही त्या म्हणाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 2:35 am