अनधिकृत बांधकामे, रेडझोन, शास्तीकर, पूररेषा, साडेबारा टक्के परतावा यासारखे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊनही ते सरकारने पाळले नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांनाही शासनाने प्रतिसाद दिला नाही, असे सांगत जनतेची कामे न करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी स्वीकारणार नाही, असा अंतिम निर्णय आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी हजारो समर्थकांच्या साक्षीने जाहीर केला. स्वतंत्रपणे निवडणूक िरगणात उतरणाऱ्या जगतापांच्या उमेदवारीला शेकापने पािठबा दिल्याने मावळ मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयास आली आहेत.
राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यासाठी जगताप समर्थकांनी आयोजित केलेल्या सभेत शेकापचे आमदार जयंत पाटील व मीनाक्षी पाटील यांनी हजेरी लावून जगतापांना पािठबा जाहीर केला. माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, उपमहापौर राजू मिसाळ, हनुमंत गावडे, बापू भेगडे, मिकी कोचर यांच्यासह चिंचवड व िपपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आपली भूमिका स्पष्ट करताना जगताप म्हणाले,की अपक्ष निवडून आल्यानंतर मंत्रीपद नको, मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवा, असे सरकारला सांगितले होते. पालिका व प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करा, पूररेषेचा घोळ मिटवा, शास्तीकर रद्द करा, रेडझोनचा प्रश्न सोडवा आणि शेतक ऱ्यांना त्यांच्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा द्या, या मागण्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शरद पवार व अजितदादांनी पाठपुरावा केला. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. पािठबा घेतला, मात्र कामे केली नाहीत, अशा सरकारबरोबर रहायचे नाही, या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून सत्ताधाऱ्यांची उमेदवारी नाकारली. पुढील निर्णय सर्वाशी चर्चा करून घेणार आहे, असे ते म्हणाले.

सर्वाधिक मताधिक्क्य़ाने विजयी होतील – जयंत पाटील</span>
मावळात शिवसेनेकडे उमेदवार नाही. आमदार लक्ष्मण जगताप उमेदवार असल्यास शेकापचा त्यांना पाठिंबा राहील. पनवेल, उरण, कर्जत भागातील ७० टक्के मतदान त्यांना मिळवून देऊ. सर्वाधिक मताधिक्क्य़ाने ते विजयी होतील. शिवसेनेशी युती नव्हती. ‘सेझ’ विरोधी आंदोलनात एकत्र होतो, असे आमदार जयंत पाटील व मीनाक्षी पाटील यांनी जाहीर केले.