News Flash

..तरीही पाण्याचा प्रश्न

आधीच्या लोकसभा निवडणुकीत लाखभर मतांनी निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांचे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य हजारांमध्ये आले आणि पुढील धोका ओळखून त्यांनी मतदारसंघातील संपर्क

| May 23, 2015 03:45 am

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी), बारामती
आधीच्या लोकसभा निवडणुकीत लाखभर मतांनी निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांचे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य हजारांमध्ये आले आणि पुढील धोका ओळखून त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला. शरद पवार यांची कन्या म्हणून त्यांच्या शब्दाला आणि भूमिकेला दिल्लीच्या राजकीय ksवर्तुळात वजन आहे. लोकसभेत त्या आक्रमक असतात, मतदारसंघातील विविध प्रश्न सातत्याने मांडत असतात. भूमिअधिग्रहण विधेयक, तंबाखूजन्य पदार्थाना बंदी अशा व्यापक मुद्दय़ांवरही भूमिका मांडली आहे. पाणी हा मतदारसंघातील मुख्य विषय आहे. बारामतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी सत्तेत असताना अनेक प्रयत्न झाले, पण अजूनही पाण्याचा प्रश्न कायम आहे. सद्य:परिस्थितीत पुणे जिल्ह्य़ात बारामती तालुक्यात सर्वाधिक टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न अद्याप सुप्रियाताईंना सोडविता आलेला नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा आणि जानाई-शिरसाई योजनांसह या भागासाठी जलसंधारणाचे विविध उपाय करण्यात आले. तसेच मोरगाव-जेजुरी-पुणे हा रेल्वे मार्ग केव्हा मार्गी लावणार याकडे नागरिकांचे लक्ष लागआहे.

वर्षांनुवर्षे प्रश्न कायम -महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)
बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिक अनेक वर्षांपासून आजही झगडतो आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू आहेत. बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे सत्तावीस गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न आहे.

प्रगत मतदारसंघाची अधिक प्रगती करायची आहे
लोकसभेत दौंड रेल्वे, िहदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्समधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन, कुरकुंभ मोरी यांसारख्या स्थानिक प्रश्नांसह बालकांचे हक्क, मोफत व सक्तीचे शिक्षण, तंबाखूजन्य पदार्थावर बंदी हे विषय मांडले आहे. जमीन अधिग्रहण कायद्यात बदल करताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल यासाठी संसदेत आग्रही राहिले. बारामती हा एक प्रगत मतदारसंघ ही ओळख कायम राहावी यासाठी कार्यरत आहे.  पायाभूत सुविधा, आधुनिक शेती, वंचित घटकांना न्याय, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार आणि सुशासन यावर आपला भर आहे.
– सुप्रिया सुळे

सुधीर जन्नू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2015 3:45 am

Web Title: supriya sule nationalist congress party
Next Stories
1 ..तर बोपखेलसारख्या घटनेच्या पुनरावृत्तीची भीती!
2 समतावादी संस्थांची ‘पुरूषभान परिषद’
3 शिवशाहिरांचे विविध राजघराण्यांकडून अभिनंदन!
Just Now!
X