पुस्तकविक्रीचा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या ‘क्रॉसवर्ड’चे देशातील सर्वात मोठे दालन पुण्यातील औंधमध्ये सुरू झाले. हे दालन तब्बल २० हजार चौरस फुटांचे असून, ते तीन मजल्यांमध्ये विस्तारलेले आहे.
या दालनात पुस्तके, सिनेमे, संगीत, खेळणी, शालोपयोगी वस्तू आणि भेटवस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातील एक मजला खास मुलांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय येथे कॉफी व काही खाद्यपदार्थही उपलब्ध असतील. हे दालन भारतातील सर्वात मोठे असल्याची माहिती क्रॉसवर्डतर्फे देण्यात आली. त्याचे उद्घाटन गेल्या आठवडय़ात झाले. पुणे प्रमुख शहर असल्याने देशातील हे महत्त्वाचे दालन येथे उभारण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.