News Flash

राम मंदिर लवकर पूर्ण होण्यासाठी मोहन भागवतांचे दगडुशेठ हलवाई गणपतीला साकडे

गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असे ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले. दर्शनासाठी मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, ती पूर्ण झाली असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असे ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. सकाळी ठीक १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभा मंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.

अभिषेकाचे पौराहित्य करणाऱ्या मिलिंद राहुरकर गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 3:38 pm

Web Title: to complete the ram temple early mohan bhagvat to move the idol of dagdusheth halwai ganpati
Next Stories
1 पोलीस कोठडीतून आरोपींचं पलायन : गार्ड कमांडरचं निलंबन, 3 पोलिसांच्या चौकशीचे आदेश
2 पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, भाजपाच्या सरपंचाविरुद्ध गुन्हा
3 दिवाळीनंतर शहरात एक वेळ पाणीपुरवठा
Just Now!
X