News Flash

उद्यम विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पी. के. कुलकर्णी

बँकेच्या संचालक मंडळाची २०१६- २०२१ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.

 

उपाध्यक्षपदी लिना अनास्कर

लघुउद्योजकांना कर्जपुरवठा करण्याच्या उद्देशाने १९८९ मध्ये स्थापन झालेल्या उद्यम विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पांडुरंग तथा पी. के. कुलकर्णी यांची, तर उपाध्यक्षपदी लिना अनास्कर यांची बिनविरोध निवड झाली.

बँकेच्या संचालक मंडळाची २०१६- २०२१ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणुकीनंतर संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक अधिकारी डॉ. अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष कुलकर्णी हे व्यावसायिक असून, अनेक वर्षे त्यांनी पतित पावन संघटनेचे काम केले आहे. एलपीजी डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे ते राज्याचे उपाध्यक्ष असून, वनाज शिक्षण मंडळात ते १५ वर्षांपासून उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्षा अनास्कर या श्रीमती अनसुया अनास्कर प्रतिष्ठानच्या संचालिका असून, प्रतिष्ठानच्या माध्यमातू अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 4:05 am

Web Title: udyam vikas sahakari bank
Next Stories
1 सोसायटीच्या माजी अध्यक्षाने ३२ दुचाकींच्या आसनाची कव्हर फाडली
2 सहा लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणारे जेरबंद
3 आजपासून पाच दिवस पाऊस कमी होणार
Just Now!
X