राज्यातील इतर शाळांप्रमाणे १५ जूनला शाळा न उघडण्याचा इशारा इंग्रजी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळांनी दिला आहे. शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव असणाऱ्या पंचवीस टक्के जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा मिळाला नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे या शाळांच्या संघटनेकडून सांगण्यात आले.
याबाबत इंडिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने पत्रकार परिषदेत सोमवारी माहिती दिली. यावेळी जागृती धर्माधिकारी, भरत मलिक, राजेंद्र दायमा आदी उपस्थित होते. राज्यात २०१२ पासून पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जात आहेत. मात्र अद्यापही अनेक शाळांना आतापर्यंत प्रवेश दिलेल्या शुल्काचा परतावा मिळालेला नाही. शासनाने शुल्क परतावा तातडीने द्यावा. त्याचप्रमाणे शाळेत होणारा खर्च, इमारत, गणवेश, पुस्तके, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रती विद्यार्थी शुल्क निश्चित करण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने केली आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि शुल्क परतावा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा १५ जूनला न उघडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेच्या पुण्यात साधारण २५० शाळा आणि राज्यात ३ हजार २०० शाळा असल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा