देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुणे : महत्त्वाकांक्षी नदी सुधार योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण के ंद्रांच्या उभारणीच्या कामांबाबतची निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून योजनेअंतर्गत प्रत्यक्ष कामांना येत्या जून महिन्यापासून प्रारंभ होईल, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली. या प्रकल्पाला वित्तीय सहायक करणाऱ्या जायका कं पनीकडून निविदा प्रक्रियांना वेळेत मंजुरी मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.

महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रत्यक्ष महापालिके त येऊन घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता गणेश बीडकर या वेळी उपस्थित होते. वर्तुळाकार मार्ग, घनकचरा व्यवस्थापन, पीएमपी, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, नदीकाठ संवर्धन प्रकल्प आदी विषयांबाबतची माहिती त्यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, की केंद्र सरकारने ‘नमामी गंगा’ या नावाखाली देशातील सर्व नद्यांच्या पुनर्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी काही निकष निश्चित के ले आहेत. एक शहर-एक प्रवर्तक या निकषाखाली सर्व नद्यांसाठी एकच निकष असणार आहेत.

निधीसाठी पाठपुराव्याचे आश्वासन

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत यंदा २ किलोमीटर लांबीचा मार्ग या वर्षी सुरू होईल. उर्वरित १० किलोमीटर लांबीचा मार्ग २०२२ मध्ये सुरू होईल. मेट्रोचा दुसरा टप्पा ६० किलोमीटर लांबीचा आहे. के ंद्राच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी तरतूद झाली आहे. नव्या प्रस्तावित मार्गासाठीही आराखडा महापालिके ने पाठविला तर केंद्र सरकारकडून अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा के ला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट के ले.