19 November 2019

News Flash

पुणे : डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे मशीनचा स्फोट; एक वर्षीय चिमुकली जखमी

हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि एक्स-रे सेंटर विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. शार्वी भूषण देशमुख असे या चिमुकलीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पिंपरीमध्ये ही घडली. या घटनेत चिमुकलीची आई आणि आजोबा देखील किरकोळ जखमी झाले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि एक्स-रे सेंटर विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शार्वीची MCU टेस्ट करण्यासाठी आई आणि आजोबा तीला घेऊन आले होते. दरम्यान, शार्वीला इंजेशन देण्यात आलं त्यानंतर टेस्ट सुरू झाली. मात्र, अचानक एक्स-रे मशीनचा काचेचा भाग फुटून आवाज झाला तसेच मशीनमधून धूर आणि रसायन बाहेर निघाले. फुटून आवाज झाल्याने मशीनमधील रसायन शार्वीच्या अंगावर उडाले यात ती जखमी झाली.

तर आई आणि आजोबांच्या देखील अंगावर हे रसायन उडाल्याने यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. शार्वीची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी दिली. डॉक्टर आणि सेंटरच्या हलगर्जीपणा विरोधात शार्वीच्या आई-वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत.

First Published on November 7, 2019 9:38 pm

Web Title: x ray machine explosion at diagnostic center in pimpri chinchwad one year old girl injured aau 85
Just Now!
X