News Flash

पुणे – यशवंतराव चव्हाण रुग्णालयात होणारी लेखी परीक्षा रद्द, परीक्षार्थींचा गोंधळ

९७ पदासाठी महाराष्ट्रातून तब्बल चार हजार अर्ज आले आहेत

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) ९७ कंत्राटी पदासाठी आज लेखी परीक्षा होती. परंतु, ती अचानक रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. अवघ्या महाराष्ट्रातून ९७ पदांसाठी तब्बल चार हजार अर्ज रुग्णालय प्रशासनाकडे आले आहेत. त्याची लेखी परीक्षा आज होणार होती. मात्र अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींची गैरसोय झाली. दरम्यान, अपेक्षापेक्षा जास्त परीक्षार्थी आल्याने लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) राजेंद्र वाबळे यांनी लोकसत्ता ऑनलाईन बोलताना स्पष्ट केले.

वायसीएम रुग्णालयात पुणे जिल्ह्यातून रुग्ण येतात. याच परिसरात वैद्यकीय विद्यालय देखील बांधण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयाला विशेष महत्व आहे. ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कॉन्सिलर, एम.एस.डब्ल्यू, डाटा एन्ट्री ऑपरेटर, डायलेसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, जी.एन.एम स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष कक्ष मदतनीस, स्त्रीकक्ष मदतनीस अशा विविध ९७ कंत्राटी पदाच्या जागेसाठी भरती करण्यात येत आहे.

परीक्षार्थीकडून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. दहा दिवसांच्या मुदतीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल चार हजार अर्ज आले आहेत. त्याची गुरुवारी पहिल्या टप्प्यातील आणि आज दुसऱ्या टप्यातील लेखी परीक्षा होती. मात्र, ती अचानक रद्द करण्यात आली. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या परीक्षार्थीची गैरसोय झाली. संतापलेल्या परीक्षार्थीनी गोंधळ घालत आपला संताप व्यक्त केला. या भरतीमध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा झाला असल्याचा आरोप परिक्षार्थींनी केला आहे. अद्याप पुढील लेखी परीक्षा कधी आहे हे निश्चित करण्यात आले नाही.

“९७ पदासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. याच कालावधीत चार हजार अर्ज आले आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी उशीर लागेल. अर्ज पात्र, अपात्र ठरवले जातात. त्यानंतरच लेखी परीक्षेला बसत येतं. २६ आणि २७ डिसेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. ती अचानक रद्द करण्यात आली असून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच नोटिफिकेशन २४ तारखेला संकेस्थळवर टाकलं होतं.
– राजेंद्र वाबळे:- अधिष्ठाता (डीन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 4:14 pm

Web Title: yashwantrao chavan memorial hospital written test cancelled students create ruckus sgy 87
Next Stories
1 ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर यापुढे अभिषेक, महापूजा नाही
2 लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात अपघात ; दोन जवानांचा मृत्यू, नऊ जवान जखमी
3 अखेर टीईटी अनुत्तीर्णाच्या सेवा समाप्तीचे आदेश
Just Now!
X