पुण्यातील नवले पुलाजवळ टँकरच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी

या घटनेतील जखमींना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे : पुणे बंगलोर महामार्गावर नवले पुला जवळील selifi  पॉईंट्स जवळ काल गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला होता.या घटनेला काही तास होत नाही.तोवर टॅकरने दिलेल्या धडकेत, ३ जणांचा मृत्यू,तर १२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

सिंहगड पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगलोर कडून पुण्याच्या दिशेने थिनर घेऊन निघालेला टँकर आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नवले पुला जवळ आला. त्यावेळी टँकर चालकाने १३ सिटर वाहनाला ओव्हर टेक करीत असताना. ते वाहन पलटी झाले आणि टँकर पुढे जाऊन एका कंटेनरला जोरात धडक दिली.या दरम्यान काही वाहनांचे देखील नुकसान झाले.मात्र ही घटना एवढी भीषण होती की, ३ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3 killed in tanker accident near navale bridge in pune zws

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या