scorecardresearch

भरघोस नफ्याच्या आमिषाने ३९ लाखांची फसवणूक

ॲमिविन ग्लोबल एक्सपोर्ट या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्यातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

भरघोस नफ्याच्या आमिषाने ३९ लाखांची फसवणूक
( संग्रहित छायाचित्र )

पुणे : ॲमिविन ग्लोबल एक्सपोर्ट या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्यातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कुंडलीक सोनटक्के (वय ४४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन व्यक्ती आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ॲमिविन ग्लोबल एक्सपोर्ट या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्यातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २९ लाख रुपये घेण्यात आले. परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे सोनटक्के यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 39 lakh fraud lure huge profit invested profit pune print news ysh

ताज्या बातम्या