पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात २२ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. मागील महिन्यात रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून दररोज सरासरी सहा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे विभागात फेब्रुवारीमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२ हजार १८२ जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, अनियमित प्रवास करणाऱ्या ८ हजार ३९२ जणांवर कारवाई करून त्यांना ४९ लाख ९८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १६५ प्रवाशांकडून १८ हजार २५०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

आणखी वाचा-कसब्यातील विजयाची वर्षपूर्ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी कशी साजरी केला?

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

रेल्वेतील फुकटे प्रवासी

विनातिकीट प्रवासी – २२ हजार १८२

विनातिकीट दंड – १ कोटी ७५ लाख रुपये

अनियमित प्रवासी – ८ हजार ३९२

अनियमित प्रवास दंड – ४९ लाख ९८ हजार रुपये

विनानोंदणी सामान – १६५ प्रवासी

विनानोंदणी सामान दंड – १८ हजार २५० रुपये