गुंतागुंतीच्या आजाराच्या ११ जणांचा समावेश

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातून करोनाची लक्षणे असलेले ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे, त्यांपैकी ११ रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांची वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले आहेत.

shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
Jupiter's zodiacal change will be favourable for Students
गुरु ग्रहाच्या राशीपरिवर्तनाची होणार कृपा; ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार भरपूर यश
dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?

रुग्णालय प्रशासनाकडून शुक्रवारी ही माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयातून बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पुणेकरांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार महिन्यांच्या बाळापासून ते रक्तदाब, फु प्फुसाचा तसेच हृदयाचे आजार असलेल्या ७५ वर्षीय रुग्णापर्यंत अनेकांचा बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये समावेश आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असलेली ५९ वर्षीय महिला खासगी रुग्णालयातून ससून रुग्णालयात पाठवण्यात आली होती. तब्बल १४ दिवस तिला ऑक्सिजन देण्यात आला. मात्र, २१ दिवसांच्या अथक उपचारांनंतर करोना संसर्गातून ती मुक्त झाल्याचे आढळले. २५ वर्षीय गरोदर महिला प्रसूतिकळा, ताप, खोकला, डोकेदुखी या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झाली.

शस्त्रक्रियेद्वारे तिची प्रसूती करण्यात आली. चाचणी केली असता महिलेला करोनाची लागण झाल्याचे, तर बाळ करोनामुक्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाळाला आईपासून वेगळे ठेवून दुग्ध पेढीतील (मिल्क बँक) दूध पाजण्यात आले. १५ दिवसांनी आई करोनामुक्त झाल्यानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात येण्यास विलंब न करण्याचे आवाहन ससूनमार्फत करण्यात आले आहे.