Viral Video: अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही. त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओदेखील खूप चर्चेत असतात; ज्यात कधी मांजर, कुत्रा, माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. नुकताच असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका माकडानं कुत्र्याच्या पिल्लासोबत असं काही केलं, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर अनेकदा माकड आणि कुत्र्यांचे गमतीशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यामध्ये कधी माकड आणि कुत्रा एकमेकांशी खेळताना दिसतात; तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
CCTV Footage Burger King 26 Year Old Guy Shot 38 Bullets
“हा सूड होता”, म्हणत बर्गर किंगमध्ये ३८ गोळ्या झाडून तरुणाची हत्या! CCTV फुटेजमध्ये दिसली ‘मिस्ट्री गर्ल’; वाचा घटनाक्रम
Haris Rauf Fight Video Viral
‘हा भारतीय असणार…’ असं म्हणत हारिस रौफ चाहत्यावर गेला धावून, संतापलेल्या हारिसने पत्नीलाही ढकललं; VIDEO व्हायरल
emotional video
अचानक कोणी आलं अन् हातात चिठ्ठी दिली! टेन्शनमध्ये बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर काही क्षणात हसू आलं; काय होतं चिठ्ठीमध्ये? पाहा Video
kids haute expression and dance on the song Gulabi Sadi
अय्या, किती गोड! ‘गुलाबी साडी’ गाण्यावर चिमुकल्याचे हटके एक्स्प्रेशन आणि डान्स; VIDEO पाहून म्हणाल, “याच्यापुढे सारे फिके”
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
Loksatta Chaturang Sad loneliness counselling Siddhartha Gautam Buddha
एका मनात होती: शोकाकुल एकटेपणा
small boy Went to kick the cat and got hit by himself
गोली बेटा मस्ती नहीं! मांजरीच्या पिल्लाला लाथ मारायला गेला अन्… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्माचे फळ…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये माकड चक्क कुत्र्याचं पिल्लू स्वतःसोबत घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गल्लीमध्ये शिरलेलं माकड तिथल्या एका पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जात असल्याचं दिसत आहे. त्या प्रसंगी एक लहान मुलगा ते पिल्लू परत करावं म्हणून माकडाच्या दिशेनं काठी मारत असल्याचं दिसत आहे. पण, तरीही ते माकड न घाबरता, पिल्लाला त्याच्यासोबत घेऊन जातं.

हेही वाचा: भावाचा पारा चढला! उन्हाला वैतागून भररस्त्यातच गाडीवर बसून केली अंघोळ; VIDEO पाहून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवरून असा अंदाज लावला जात आहे की, कुत्र्याच्या पिल्लाच्या मालकानं माकडाची काहीतरी खोड काढली असावी; ज्यामुळे तो रागानं त्या पिल्लाला घेऊन जात असेल.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @createculture4u या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करीत आहेत. याबाबत एका युजरनं लिहिलंय, “जर तुम्हाला तुमचं कुत्र्याचं पिल्लू हवं असेल, तर २०-२५ किलो केळी द्या.” तर, आणखी एकानं लिहिलंय, “बहुतेक त्यांचं काहीतरी जुनं भांडण असेल.” तर, आणखी एकानं लिहिलंय, “त्या निरागस पिल्लासोबत खूप वाईट झालं.” या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत; तर चार लाखांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.