अभ्यास करताना मोबाइल पहात असलेल्या मुलाला रागविल्याने बारावीतील मुलाने आईचा गळा दाबून तिचा खून केल्याचां धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणीकाळभोर पोलिसांनी जिशन जमीर शेख (वय १८, रा. उरुळीकांचन) या मुलाला अटक केली आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.

हेही वाचा- अडीच वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा टांझानियाचा अमली पदार्थ तस्कर ‘जेम्स’ जाळ्यात, २३ लाख रुपयांचे कोकेन जप्त

IIT mumbai, employee suicide,
ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या
students in 5th 8th failed in pune city
पाचवी,आठवीच्या अनुत्तीर्णांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा- पुणे : पोटनिवडणुकीत उमेदवारांसाठी ‘स्वस्ताई’; शाकाहारी जेवणाचा दर ८१ रुपये, तर मांसाहारी जेवणाचा २०० रुपये

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नेमकी कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातील पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला़. ही घटना घडली, तेव्हा वडील जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली. जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा जिशान हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाइल पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली. ती जिशानला रागविली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे जिशान याने आईला जोरात भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा- चिंचवडमध्ये ‘वंचित’चा राहुल कलाटे यांना पाठिंबा, ‘भाजपला रोखण्यासाठी निर्णय’

आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. मात्र मृत्यू झाला असल्याने रक्त आले नाही. त्याने वायर पंख्याला अडकविली. फरशीवर आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यांनी तस्लीम यांना रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. शवविच्छेदनात खुनाचा प्रकार समोर आला. याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्यावतीने फिर्याद देण्यात आली असून मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक काळे तपास करीत आहेत़.