पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. हनुमंत बळीराम जाधवर (वय ३८, रा. धाराशीव) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. या बाबत अप्पासाहेब नंदगावे (वय ३४, रा. मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 दुचाकीस्वार नंदगावे आणि जाधवर लोणी काळभोरहून हडपसरकडे निघाले होते. लोणी काळभोर फाटा चौकात अचानक एक मोटार आडवी आली. त्यामुळे दुचाकीस्वार नंदगावे यांनी दुचाकी थांबविली. त्या वेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी जाधवर यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान जाधवर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Ghodbunder Ghat Road, Ghodbunder Ghat Road Repairs, Ghodbunder Ghat Road Repairs to Conclude 7th June Evening, heavy traffic on ghodbunder road, thane news, ghodbunder road news,
घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार
Navi Mumbai, knife attack,
नवी मुंबई : रस्त्यावर एकावर चाकू हल्ला, बार आणि लॉजमध्ये घुसून टोळक्याचा धुडगूस, पाच जणांवर गुन्हा दाखल
Residents of MIDC distressed by overnight digging of Metro on Shilphata Road in Dombivli
डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त
Man Set Ablaze While Sleeping, Gadchiroli, challewada Village, Investigation Underway, crime news,
धक्कादायक! अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले; गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा गावातील घटना
A minor girl hit a bike while driving a cargo pickup pune
शिरूरमध्ये पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू
three different accidents on mumbai ahmedabad highway
वसई : महामार्गावरील वाहतूक कोंडी जीवावर बेतली; तीन अपघातात ४ दुचाकीस्वारांचा मृत्यू
blast in dombiwali
डोंबिवलीत दत्तनगरमध्ये चायनिज सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; तीन जण गंभीर जखमी, दोन अत्यवस्थ
Goa bus Accident
गोव्यात भीषण अपघात; रस्त्यालगतच्या झोपड्यांवर धडकली बस, चार मजूरांचा मृत्यू, पाच जखमी