पुणे-सोलापूर महामार्गावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात एक खासगी बस उलटल्याने १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुण्याकडून सोलापूर मार्गे तेलंगणाच्या दिशेने जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस रात्री नऊच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. एका दुसऱ्या वाहनाला बसची धडक होऊ नये यासाठी अचानक ब्रेक लावावे लागले आणि त्यामुळे बस उलटली अशी प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले होत तात्काळ मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. महामार्गावर एका ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली होती, ढाब्यात जेवण केल्यानंतर सर्व बसमध्ये परतले, त्यानंतर बस दुसऱ्याने चालवायला घेतली अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी बस खूप वेगात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली आहे.

Gondia Bus Accident, One Dead 17 Injured in gondia accident, Private Travel Bus Crashes, Gondia Goregaon Highway, accident news, gondia news,
गोंदिया : खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, एकाचा मृत्यू; १७ जखमी
Ghatkopar - Andheri - Versova, Metro 1,
‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला दहा वर्षे पूर्ण, आतापर्यंत ९७ कोटी प्रवाशांनी केला प्रवास
Mumbai, Metro 2A, Metro 7,
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका : दोन्ही मार्गिकेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, आता ‘इतकी’ दैनंदिन प्रवाशी संख्या
Mumbai, passengers,
मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरुन आतापर्यंत दहा कोटी प्रवाशांचा प्रवास
navi Mumbai drunk and drive marathi news
नवी मुंबई: आरटीओची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई
Samruddhi Highway, Shirdi Bharveer Phase, Shirdi Bharveer Phase Completes One Year, 1 Crore Vehicles, Rs 725 Crore Revenue, maharashtra,
‘समृद्धी’वरून एक कोटी वाहनांची धाव ‘एमएसआरडीसी’ला पथकरातून ७२५ कोटी
mega block on Central and Western Railway on Sunday
मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
Wait-listed passengers occupy aisle to toilet on Mumbai-bound Suryanagari Express
शौचालयाजवळ झोपून वेटिंग लिस्टमधील प्रवाशांनी केला प्रवास, मुंबईमार्गे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचा Video Viral, पश्चिम रेल्वे दिले उत्तर