खासगी वित्तीय संस्थेत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या तरुणाने व्यवस्थापकाच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुणे: पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने; पोलीस महासंचालकांची माहिती
उत्तम सखाराम धिंडले (वय २७, रा. भैरवनाथनगर, किरकीटवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक अमन खुराणा (वय २४, रा. विमाननगर) याला अटक करण्यात आली आहे. धिंडले नवविवाहित आहे. तो एका खासगी वित्तीय संस्थेत काम करत होता. धिंडले याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. धिंडले याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली. वित्तीय संस्थेचे व्यवस्थापक खुराणा यांच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धिंडले यांनी चिठ्ठीत नमूद केले.
हेही वाचा >>>पुणे: ‘ईडी’च्या धाकामुळे भाजपच्या तालावर मनसेचा नाच; राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेवर टीका
खुराणा कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी दबाब आणत होता. खुराणाच्या जाचामुळे धिंडलेने आत्महत्या केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार तपास करत आहेत.