पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी पहाटे एका खासगी बसचा अपघात होऊन त्यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
बंगुळूर मार्गावर नेर्ले गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये सागर साळुखे (रा. सांगली), नजीर मुजावर (रा. गुंडेवाडी, मिरज) आणि कृष्णा पाटील (रा. बेळगाव) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींवर कराडमधील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुभाजकाला धडकून ही बस उलटल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
पुणे-बंगळुरू महामार्गावर बसचा अपघात, ३ ठार
या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 21-12-2015 at 09:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on pune bangalore highway